S M L

दलित तरुणीवर अतिप्रसंग करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2013 11:27 PM IST

दलित तरुणीवर अतिप्रसंग करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ahamadnagar story05 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यात एका दलित तरुणीवर अतिप्रसंग करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक घटना घडलीय. पीडित तरुणींने अतिप्रसंगाला विरोध केल्यामुळे आरोपींने जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एकाला दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आलीय. संदिप अडसूळे असं आरोपीचं नाव आहे.

नगरमध्ये कामर गावात ही घटना घडली. पीडित तरूणीवर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी नगर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. मिळालेल्या माहितीनुसार सदरील तरूणीवर परिचयातल्या तरुणानं अतीप्रसंगाचा प्रयत्न केला आणि मुलीने विरोध करताच तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2013 11:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close