S M L

शहीद कुंडलिक माने यांना अखेरचा निरोप

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2013 03:14 PM IST

शहीद कुंडलिक माने यांना अखेरचा निरोप

kundlik mane08 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीर येथील सिमारेषेवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शहीद कुंडलिक माने यांच्यावर आज सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माने यांचे कुटुंबीय, गावकरी, गृहमंत्री आर.आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, कागलचे आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. माने यांना अग्नी दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी 'शहीद माने अमर रहे' अशा घोषणा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्याआधी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पिंपळगावबरोबरच जवळच्या गावांतल्या लोकांनीदेखील अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2013 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close