S M L

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सायना क्वार्टर फायनलमध्ये

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2013 07:56 PM IST

Image img_183682_sayana_240x180.jpg08 ऑगस्ट : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सायना नेहवालनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. तिसर्‍या फेरीत सायनाने थायलंडच्या पोनटीपचा पराभव केला. पहिला सेट सायनाला 21-18 असा गमवावा लागला होता. पण यानंतर आपली कामगिरी उंचावत सायनानं मॅचवर वर्चस्व गाजवलं. दुसरा सेट 21-16 तर तिसरा सेट 21-14 असा सहज जिंकत सायनाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पहिलं जेतेपद पटकावण्यापासून सायना आतो दोन पावलं दूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2013 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close