S M L

राज ठाकरेंना सातारा जिल्हा कोर्टाकडून जामीन

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2013 07:33 PM IST

Image img_200682_rajondushkal_240x180_300x255.jpg08 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज सातारा जिल्हा कोर्टाने जामीन दिला. 2008 मध्ये राज यांनी परप्रांतींयाविरोधात केलेल्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सातार्‍यात अनेक वाहनांची तोडफोड केली होती. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन तर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आले होते. आता या चारही गुन्ह्यात राज यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यातील एका गुन्ह्यात राज यांच्याविरोधात अटक वॉरन्ट जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे राज यांना आज कोर्टात हजर राहवं लागलं. आज सकाळी राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसह कोर्टात हजर राहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2013 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close