S M L

सचिन सूर्यवंशींची सांगलीला बदली

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2013 04:08 PM IST

Image img_236082_ramkadammnsandthakur_240x180.jpg09 ऑगस्ट : अखेर पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलीय. सचिन सूर्यवंशी यांना बदलीच्या आदेशानुसार पुढच्या 24 तासांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात रुजू व्हायचंय.

सूर्यवंशी यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवली होती. ठाकूर यांच्याकडून वेग मर्यादेचं उल्लंघन झालं होतं असं सूर्यवंशीचं म्हणणं होतं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर ठाकूर यांनी विधिमंडळात सूर्यवंशींवर हक्कभंग सादर कऱण्याची मागणी केली होती.

त्यावेळी हजर असलेल्या सचिन सूर्यवंशींना क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांनी बेदम मारहाण केली होती.  पावसाळी अधिवेशनात पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. त्याचबरोबर सूर्यवंशी यांचंही निलंबन मागे घेण्यात आलंय. निलंबनाची कारवाई हटल्यानंतर काही आठवड्यातच त्यांची बदली करण्यात आलीय. त्यांच्या बदली म्हणजे आमदारांनी बदला घेतला अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close