S M L

मनोहर जोशींना लोकसभेची उमेदवारी?

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2013 08:03 PM IST

मनोहर जोशींना लोकसभेची उमेदवारी?

09 ऑगस्ट : शिवसेनेने लोकसभेसाठी आपल्या उमेदवार निवड प्रक्रियेला सुरूवात केली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून सेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातंय. आज 'मातोश्री'वर याबाबत शिवसेनेच्या या मतदारसंघातल्या पदाधिकार्‍यांची एक बैठक पार पडली.

यावेळी मतदारसंघातल्या पदाधिकार्‍यांची मतं आजमावून घेण्यात आली. आता उद्या याबाबतची आणखी एक बैठक पार पडणार असून त्यानंतर दक्षिण मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाईल.

याच प्रकारे पुढच्या चार ते पाच महिन्यात शिवसेनेच्या इतर मतदारसंघासाठी उमेदवार निवडीची प्रक्रीया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 08:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close