S M L

दाऊद पाकमध्ये होता, पाक सरकारने दिली कबुली

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2013 03:28 PM IST

daud ibrahim09 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या अगोदर पाकिस्तानमध्ये लपून बसला होता अशी कबुली पंतप्रधान नवाज शरीफ यांचे राजकीय प्रतिनिधी शहरयार खान यांनी दिली. आजपर्यंत दाऊदबद्दल आम्हाला काहीच माहित नाही असा आव आणणार्‍या पाक सरकारने पहिल्यांदाच कबुली दिलीय. तसंच दाऊद हा सध्या युएईत अर्थात अरब अमिरातीत असावा अशी टीप ही दिली. पण दाऊद पाकमध्ये नाही हे खात्रीने सांगू शकत नाही, जर असता तर त्याला अटक केली असती असंही शहरयार खान म्हणाले. लंडनमध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शहरयार खान यांनी ही कबुली दिली.

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादी पहिल्या क्रमांकारवर असून अनेक प्रकरणात भारतात त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामागे दाऊदच होता. पाक मधूनच दाऊद मुंबईतील आपल्या गँग चालवत असल्याचंही अनेक वेळा सिद्ध झालंय.  अलीकडेच झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातही आरोपपत्रात दाऊदच नाव आहे. भारताने अनेक वेळा दाऊदच्या कारवायाबद्दल पाक सरकारला माहिती पुरवली मात्र पाक सरकारने प्रत्येक वेळी हातवर केली. आज दाऊद पाकमधून पळून गेल्यानंतर पाक सरकारने तो पाकमध्ये लपला होता अशी कबुली दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2013 11:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close