S M L

सिंधूचा पराभव पण ब्राँझ मेडलची कमाई

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2013 03:34 PM IST

सिंधूचा पराभव पण ब्राँझ मेडलची कमाई

p v sindhu10 ऑगस्ट : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये पी व्ही सिंधूला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागलाय. पण सिंधूनं भारतासाठी ऐतिहासिक ब्राँझ मेडल पटकावलंय. सेमीफायनलमध्ये सिंधूचा मुकाबला होता तो थायलंडच्या वर्ल्ड नंबर 3 असलेल्या इंथनॉनशी. इंथनॉननं सिंधूला 21-10, 21-13 अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत केलं. पण सिंधूसाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरलीये. आपल्या पहिल्याच वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खेळणार्‍या सिंधूनं वर्ल्ड नंबर 2 वँग यिहान आणि वर्ल्ड नंबर 7 वँग शिक्शिनला पराभवाचे धक्के दिलेत. 1983 ला प्रकाश पादुकोणनंतर भारताचं वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील वैयक्तिक प्रकारातील हे पहिलंच ब्राँझ मेडल ठरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2013 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close