S M L

मुख्यमंत्री-माणिकरावांचा छुपा संघर्ष उघड

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 06:27 PM IST

Image img_211092_cmvsmanikaro_240x180.jpg'लोकसभेसाठी मंत्र्यांना उमेदवारी नाही'

12 ऑगस्ट : काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे मंत्र्यांना उमेदवारी देण्याची गरज नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांच्या विधानाला छेद दिला आहे.

मंत्रिमंडळातील काही काँग्रेस मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत केलं होतं. ठाकरेंच्या आजच्या विधानामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांमधला वाद पुन्हा सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत.

या अगोदरही माणिकराव यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी माणिकरावांनी जयंत पाटील काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहे असा गौप्यस्फोट केला होता. यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटला होता. मात्र, माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच हे केलं होतं अशी राजकीय गोटात चर्चा होती. आता पुन्हा एकदा माणिकराव ठाकरे विरूद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close