S M L

राज्य सहकारी बँकेला 319 कोटींचा निव्वळ नफा

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 11:34 PM IST

Image img_154362_bankmsc_240x180.jpg12 ऑगस्ट : अडीच वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या बरखास्तीची नामुष्की ओढावलेली राज्य सहकारी बँक अखेर पूर्णपणे नफ्यात आलीय. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण करतानाच 319 कोटींचा निव्वळ नफा मिळवलाय. त्यामुळे 8 वर्षांनंतर राज्य बँक आपल्या 2100 सभासदांना 7 टक्क्यांचा डिव्हिडंट वाटणार आहे.

म्हणजेच बँकेकडून 314 कोटी रुपयांची नफा विभागणी होणार आहे. साहजिकच बँकेला 'अ' दर्जा मिळालाय. बँकेचं नेटवर्क वाढून ते 1 हजार 19 कोटी रुपयांपर्यंत पोचलंय. तर सीआरएआर 10 पूर्णांक 86 टक्क्यांपर्यंत पोचलंय. बँकेने सुमारे 546 कोटी रुपयांची कर्ज वसुली केलीय.

तर 34 संस्थांची मालमत्ता विकून 625 कोटी रुपये वसूलही केलेत. पण, बँकेच्या ठेवींमध्ये मात्र घट झालीय. तसंच गेल्या अडीच वर्षांमध्ये बँकेकडून बँकिंग व्यवसाय फारसा झालेला नाही. आता, नव संचालक मंडळ यायला किमान वर्ष जाणार असं दिसतंय.

ठळक मुद्दे

 • - राज्य सहकारी बँक अखेर नफ्यात
 • - राज्य सहकारी बँकेला 391 कोटींचा निव्वळ नफा
 • - आठ वर्षांनंतर राज्य बँक वाटणार लाभांश
 • - ही बँक डबघाईला आल्यानंतर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं
 • - त्यानंतर बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाली होती
 • - प्रशासकांच्या कामगिरीमुळे बँक अखेर नफ्यात
 • - सभासदांना वाटणार 7 टक्के लाभांश
 • - राज्य सरकारलाही मिळणार लाभांशाच्या रूपात 7 कोटी
 • - बँकेचा सीआर-एआर 10.86 टक्क्यांवर पोहोचला
 • - बँकेला अ दर्जा मिळाला
 • - बँकेचं पॉझिटिव्ह नेटवर्क 1 हजार 19 कोटी इतकं झालं
 • - 7 टक्के लाभांशाची 314 कोटींची रक्कम 2129 सभासदांना वाटणार
 • - आतापर्यंत 546 कोटींची कर्जवसुली करण्यात यश
 • - 34 संस्थांची मालमत्ता विकून 625 कोटींची वसुली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 11:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close