S M L

'खड्डे बुजवा, चांगल्या कंत्राटदारांना कामं द्या'

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2013 05:24 PM IST

Image img_189872_mumbaimnp_240x180_300x255.jpg13 ऑगस्ट : मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांवरून मुंबई हायकोर्टाने सगळ्या सरकारी यंत्रणांना चांगलंच फटकारलंय. जर सध्या रस्त्यांचं काम करणारे कंत्राटदार नीट काम करत नसतील, तर नामांकित कंपन्यांना कंत्राटं का देत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश मोहित शहा यांनी महापालिका आणि MMRDAला विचारलाय.

शहराच्या एंट्री आणि एक्झिटच्या ठिकाणी खड्‌ड्यांमुळे होणार्‍या ट्रॅफिक जामकडे लक्ष ताबडतोब लक्ष द्या असे आदेश न्यायाधीशांनी दिलेत. तुमचं पेपर प्रझेंटेशन उत्तम आहे पण प्रत्यक्ष कामाचं काय असा सवालही मुख्य न्यायाधीशांनी विचारला.

तर आम्ही मोठ्या कंपन्यांना रस्ते दुरुस्तीसाठी बोलावतो, पण ते प्रतिसाद देत नाहीत असं महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी म्हटलंय. खड्‌ड्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात पालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. या पत्रात पावसाळ्यापूर्वीची काही कामं करायची राहून गेली अशी कबुली पालिकेनं दिलीय.

रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण तसंच पावसाळ्याच्या कामांसाठी करावयची टेंडर प्रक्रिया काढायला उशीर झाल्याचं महापालिकेनं मान्य केलंय. सोळा हजार खड्‌ड्यांपैकी 9 हजार खड्डे भरण्यात आले आहेत. बाकीचे खड्डे भरण्याचं काम सुरू असल्याचंही महापालिकेनं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2013 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close