S M L

अखेर 'लखोबा लोखंडे'ला अटक

Sachin Salve | Updated On: Aug 14, 2013 08:19 PM IST

lakhoba14 ऑगस्ट : एकाकी जीवन जगणार्‍या आठ महिलांना लग्नाचं आमिष दाखवून फसवणार्‍या नवी मुंबईतल्या भामट्याला पकडण्यात यश आलंय. मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास पनवेल इथल्या नेरे गावाजवळ संतोष वाळुंजला अटक करण्यात आलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष वाळूंज फरार होता.

मोबाईल टॉवर लोकेशनच्या माध्यमातून घेतलेल्या शोध मोहिमेत संतोष पनवेल इथल्या नेरे गावात सापडला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आज दुपारी त्याला पनवेल इथल्या कोर्टात हजर करण्यात आले.

संतोषनं 8 महिलांना फसवल्याचं उघड झालंय. महिलांकडील लाखो रुपयांचं दागिने घेऊन तो पसार झाला होता. त्याची चौकशी सुरू असून अजून किती महिलांना त्यानं फसवलंय ते उघड होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2013 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close