S M L

दंबुला वनडे भारतानं जिंकली

28 जानेवारी, श्रीलंका श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वन डे सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये भारतानं विजय मिळवला आहे. विजयासाठी समोर असलेलं 247 रन्सचं लक्ष्य भारतानं 48.2 ओव्हर्समध्ये सहा विकेट राखून पूर्ण केलं. भारताची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र रैना आणि गंभीर आणि नंतर धोनी-युवराजच्या पार्टनरशिपने भारताला सावरलं. जबाबदारीनं खेळ करणार्‍या धोणीनं पुन्हा एकदा कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला विजयी लक्ष्य गाठून दिलं. मात्र एकहाती शतकी खेळी करणार्‍या जयसूर्याला 'मॅन ऑफ द मॅच' दिलं गेलं. भारतची सुरुवात डळमळीत झाली. सचिन तेंडुलकर अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रैना आणि गंभीनं जबाबदारीनं खेळ करत भारताला सुस्थितीत पोहोचवलं. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने भारतावर काहीसं दडपण आलं होतं. गंभीरनं 62 रन्सची खेळी केली. त्यानंतर धोणी-युवराजची जोडी जमली आणि त्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली. नेहमीप्रमाणे आक्रमक शॉट खेळण्याच्या नादात युवराज सिंग 41 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारताचा स्कोअर होता 181 रन्सवर 4 विकेट. यानंतर धोणीनं सूत्र आपल्या हातात घेतली आणि रोहित शर्माच्या साथीत भारताला विजयी लक्ष्य गाठून दिलं. धोणीनं नाबाद 59 रन्स फटकावले. याआधी टॉस जिंकून भारतानं श्रीलंकेला बॅटिंग दिली. श्रीलंकेची पहिली विकेट शून्य रन्सवरच पडली, मात्र अनुभवी जयसूर्याने 28वी सेंच्युरी फटकावत श्रीलंकेचा डाव सावरला. याच मॅचमध्ये त्याने आपल्या 13000 रन्सही पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो सचिननंतरचा एकमेव फलंदाज आहे. त्याच्या खेळीमुळेच श्रलंकेला 246 धावांपर्यंत मजल मारता आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2009 12:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2009 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close