S M L

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2013 04:06 PM IST

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा मृत्यू

15 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार आणि मुंबईमधील 1993 च्या बाँम्बस्फोटामधील प्रमुख आरोपी इक्बाल मिर्ची यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. पण या वृताला लंडन पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

इब्राहिम मेमन उर्फ इक्बाल मिर्ची हा दाऊदचा सोने आणि अमली पदार्थांचा व्यापार सांभाळायचा. 1993 च्या बॉम्बस्फोटात इक्बालचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं.

भारतासह इंटरपोललाही तो विविध गुन्ह्यांमध्ये हवा होता. गेल्या काही दिवसांपासून इक्बाल लंडनमध्ये होता.भारताने त्याच्या हस्तांतरणासाठी ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2013 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close