S M L

'जागावाटपाचा निर्णय आधी राज्यात नंतर दिल्लीत'

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2013 04:02 PM IST

'जागावाटपाचा निर्णय आधी राज्यात नंतर दिल्लीत'

17 ऑगस्ट : जागावाटपाचा निर्णय दिल्लीत नाही तर राज्यात होईल असं प्रतिउत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शरद पवारांना दिलंय. मला दिल्लीतून जागावाटप झालं असं काही सांगण्यात आलं नाही. आता शरद पवार काय बोलले असतील त्याबद्दल मला काही माहिती नाही.

2004 साली निवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्षांनी समोरासमोर बसून चर्चा केली होती. आताही चर्चा तशीच होईल असं ही ठाकरे यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा आधीचाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. यावर खुद्द शरद पवारांनीच शिक्कामोर्तब केलंय. काँग्रेस 26 जागा तर राष्ट्रवादी 22 जागांवर आपले उमेदवार उभे करेल.

हा 26-22 चा फॉर्म्युला काँग्रेस हायकमांडशी चर्चा करुनच निश्चित झालाय असं शरद पवारांनी जाहीर केलंय. पण पुन्हा एकदा माणिकराव ठाकरे यांनी जागावाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल याचा पुनरुच्चार केलाय. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधला जागावाटपाचा तिढा कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2013 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close