S M L

खिडकीचे गज कापून बालसुधारगृहातून 16 मुलं पळाली

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2013 04:25 PM IST

खिडकीचे गज कापून बालसुधारगृहातून 16 मुलं पळाली

17 ऑगस्ट : जळगावमधल्या निरीक्षण बालसुधारगृहातील तब्बल 16 मुलं खिडकीचे गज कापून पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टच्या पहाटे 5 च्या सुमारास या 16 मुलांनी बालसुधारगृहातून पलायन केलं. खोली क्रमांक 2 च्या खिडकीचे गज तब्बल 16 ठिकाणी कापले आणि मधली जाळी तोडली. आणि त्यातून ते पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रभारी अधीक्षकांनी ही माहिती ताबडतोब पोलिसांना कळवली.

पोलिसांनी वायरलेस यंत्रणेचा वापर करून सर्व पोलीस ठाण्यांना ही माहिती कळवली. त्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आणि जळगावला पाठवले.

या पसार झालेल्यांपैकी काही मुलांवर चोरी, मारामारी आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. मात्र या प्रकारामुळे सुधारगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2013 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close