S M L

छावा-शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2013 05:29 PM IST

छावा-शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

17 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षण जागर परिषदेत छावाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. मेटे यांची परिषद उधळून लावण्यासाठी छावाचे कार्यकर्ते परिषदेत घुसले. मात्र विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झाली.

यावेळी विनायक मेटे मंचावर उपस्थित होते. त्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. या मारामारीत छावाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. तर एका स्थानिक वृत्तपत्राच्या छायाचित्रकारालाही मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्याचा कँमेरा फोडला.

मेटे यांची परिषद चालू असतांना छावाच्या दुसर्‍या गटानं परिषदेच्या स्वागत कमानीवरील विनायक मेटे यांच्या पोस्टरला आग लावली. एकंदरीतच विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे जागर परिषद भागात रणभूमीचं स्वरूप आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2013 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close