S M L

'रिक्षा बंद'वर शरद राव ठाम

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2013 10:44 PM IST

sharad rao17 ऑगस्ट : रिक्षा चालक संघटनेनं 21 ऑगस्टपासून तीन दिवस पुकारलेला संप होणारच असा ठाम निर्धार कामगार नेते शरद राव यांनी व्यक्त केला. या रिक्षा बंदला आव्हान देणार्‍या स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितीश राणेंनाही उत्तर देत हा बंद होणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. नितेश राणे यांच्या भाषेमुळे त्यांचे वडील नारायण राणे यांना दहा वेळा माफी मागावी लागते असा टोलाही त्यांनी नितेश राणेंना लगावलाय. ते ठाण्यात बोलत होते.

तसंच सुगंधी तंबाखू आणि मावा बंद करणार्‍या आर.आर. पाटील यांच्या गृहखात्याचे पोलीस महिन्याकाठी टपरीवाल्यांकडून 100 कोटी रूपयांचा हफ्ता वसूल करतात असा थेट आरोप  राव यांनी केलाय.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष केलंय. मुख्यमंत्री इमारतींना एफएसआय पटकन वाढवून देतात मात्र रिक्षा चालवणार्‍या गरीबांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात अशी नाराजी त्यांनी व्यक्त केलीय. रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने येत्या 21 ऑगस्ट पासून 72 तासांचा बंद पुकारण्यात आलाय. यात 2 लाख रिक्षाचालक सहभागी होणार असल्याची माहिती कामगार नेते शरद राव यांनी दिलीय.

दरम्यान, मुंबई भाजपने राव यांच्या प्रस्तावित रिक्षा बंदला आव्हान दिलंय. राज्यातल्या सुमारे साडे सात लाख रिक्षा चालकांना वेठीस धरून मुंबईच्या जनतेलाही वेठीला धरताहेत असं वक्तव्य करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बंद विरोधात भूमिका घेतलीय. शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तेव्हा याबाबत राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंदचा बंदोबस्त करतील असं आव्हानही त्यांनी शरद रावांना दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2013 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close