S M L

मुंबई गँगरेप : तिसर्‍या आरोपीला अटक

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2013 09:26 PM IST

मुंबई गँगरेप : तिसर्‍या आरोपीला अटक

gang rape24 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी संध्याकाळी तिसर्‍या आरोपीलाही अटक करण्यात आली. या आरोपीला शनिवारी संध्याकाळी महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर दुसर्‍या आरोपीला शुक्रवारी रात्री दक्षिण मुंबईतल्या एका व्हिडिओ पार्लरमध्ये अटक करण्यात आली.

पहिल्या आरोपीला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उरलेले दोन फरार आरोपींना पकडण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय, असं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय. हे आरोपी स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

दरम्यान, पीडित मुलीची तब्येत आता स्थिर असून तिला लवकरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. गुरूवारी संध्याकाळी महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये पीडित तरूणी आपल्या मित्रासह फोटोशूट करण्यासाठी गेली असता तीच्यावर दोन नराधमांनी बलात्कार केला. तर तिघांनी या नराधमांना मदत केली. सर्व आरोपींनी ओळखी पटलीय.

या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून पत्रकार आणि छायाचित्रकार संघटनेनं तीव्र निषेध व्यक्त केला. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलीय. दरम्यान, या प्रकरणातला अटक झालेला पहिला आरोपी हा अल्पवयीन असल्याचं त्याच्या आजीचं म्हणणं आहे. हा आरोपी महालक्ष्मी परिसरातच राहतो. आपला नातू अत्यंत चांगला मुलगा असून तो असं करणं शक्यच नाही, असं त्याच्या आजीचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2013 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close