S M L

MPSCचा सावळा गोंधळ सुरूच

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2013 04:26 PM IST

Image img_236882_mpscexam2013_240x180.jpg24 ऑगस्ट : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उद्या राज्यभरात परीक्षा होणार आहे. पण तत्पूर्वीच एमपीएससीच्या भोंगळ कारभाराची चिन्हं पुन्हा दिसू लागली आहेत. परीक्षार्थीना देण्यात आलेले हॉल तिकीटावरचे सीट नंबर बदलण्यात आले आहेत.

याविषयी परीक्षार्थीना पूर्वकल्पनाही देण्यात आलेली नाही. काही परीक्षाथीर्ंना तर दोन-दोन हॉल तिकिट मिळाली आहेत. दोन्ही हॉलतिकिटावर परीक्षा केंद्र वेगवेगळी आहेत.

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एपीएससीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या अगोदरही वेबसाईटचा डाटा करप्ट झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2013 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close