S M L

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2013 04:41 PM IST

Image img_236272_vidhanbhavan45_240x180.jpg24 ऑगस्ट : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकी आता चुरशीची होणार असे चिन्ह आहे. कारण आता तब्बल पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. ही निवडणूक राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यासाठी एकतर्फी होईल अशी चर्चा होती. पण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वेगळीच खेळी खेळली आहे.

शुक्रवारी अगदी शेवटच्या क्षणी भाजपच्या दोन उमेदवारांबरोबरच बारामतीचे माजी खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक संभाजीराव काकडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज काकडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

काकडेंच्या अर्जावर भाजप आमदारांच्याच सह्या असल्यानं गोपीनाथ मुंडे यांच्याच प्रयत्नांनी काकडेंचा अर्ज दाखल झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत मराठा विरूद्ध वंजारी असा सामना होऊन निवडणुकीची दोरी मराठा तसंच अपक्ष आमदारांच्या हातात देण्याची ही खेळी आहे. त्यामुळे घोडेबाजारही तेजीत येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2013 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close