S M L

मुंबई गँगरेप:'एकही आरोपी अल्पवयीन नाहीत'

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2013 08:00 PM IST

Image img_231052_satyapalsingh_240x180.jpg26 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातला एकही आरोपी अल्पवयीन नाही, असं पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी स्पष्ट केलंय. पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. ते सर्व जण बेरोजगार आहेत आणि एकाच भागात राहतात.

सर्वच आरोपींवर चोरीचे गुन्हे असल्याचं सत्यपाल सिंह यांनी सांगितलं. आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी कोर्टात करणार असल्याचं ते म्हणाले. महिलांना 24 तास सुरक्षा देण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

रविवारी दिल्लीतून पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. सर्व आरोपींनी आता पोलीस कोठडी देण्यात आली मात्र वैद्यकीय अहवाल येण्यास उशीर होईल अशी शक्यता आहे त्यामुळे महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यास क्राईम ब्रांचने असमर्थता दर्शवलीय. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निवड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2013 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close