S M L

नागपूरमध्ये विक्रमाच्या नावाखाली गायकांची फसवणूक

29 जानेवारी, नागपूरमुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना,श्रद्धांजली म्हणून,नागपूरमध्ये सतत 36 तास गाण्याचा विक्रम करण्यात येणार होता. त्यासाठी गायकांनी गायलाही सुरुवात केली होती. मात्र संयोजकांनी या उपक्रमाची माहिती गिनीज बुक च्या अधिकार्‍यांना न दिल्याची माहिती गायकांच्या शुभचिंतकांना मिळाली. त्यामुळे त्यांनी संयोजकांनर आरोप करत तेथे गोंधळ घातला. मनीष पाटील आणि नितीन पाटील असं संयोजकांचं नाव आहे.नागपुरातील मोर भवन येथे प्रसिद्ध शास्त्रीय गायक दत्ता क्षीरसागर य्आपल्या शिष्यांसमावेत बुधवारपासून गात होते. या आधीचा विक्रम 23 तासांचा होता. 23 तास पूर्ण झाल्यावर गायकांच्या हितचिंतकांनी संयोजकांना गिनीज बुकबद्दल विचारणा केली. त्यावेळेस संयोजकांना कोणतीही ठोस उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे अधिक चोकशी केली असता हा सगळा संयोजकांचा बनाव असल्याचं स्पष्ट झालं. गायकांना आश्वासन देऊनही साधा गिनीज बुकच्या अधिकार्‍यांना संपर्कही साधण्यात आला नसल्याचं निदर्शनास आलं आहे.दरम्यान मलाच काही लोकांनी धोका दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण मनीष पाटील यांनी दिलं आहे. पोलिसांनी संयोजकांवर कारवाई क रत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या विक्रमासाठी संयोजकांनी काही संस्थांकडून पैसेही गोळा केल्याची माहिती समोर येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 08:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close