S M L

गोरेगाव स्टेशनवर तरुणीवर ब्लेडने हल्ला

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2013 04:44 PM IST

गोरेगाव स्टेशनवर तरुणीवर ब्लेडने हल्ला

bled attack27 ऑगस्ट : मुंबईत लोकलमध्ये अमेरिकेच्या तरूणीवर हल्ल्याची घटना ताजी असताना आणखी एका तरूणीवर लोकलमध्ये ब्लेडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली.

सोमवारी रात्री पावणेआठ वाजता गोरेगाव स्टेशनवर एका अज्ञात व्यक्तीनं 28 वर्षांच्या रुपाली शिंदे या तरुणीवर ब्लेडनं हल्ला केलाय. त्यात तिच्या डोक्याला मार लागला.तिच्या डोक्याला 7 टाके पडलेत. ही तरुणी लोकलमध्ये चढत असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला.

रुपाली पेन बनविण्याच्या कंपनीत काम करते. या हल्ल्यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलीस पुढचा तपास करत आहेत. या घटनेनंतर महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तिच्यावर सध्या नालासोपारामधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2013 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close