S M L

धनंजय मुंडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2013 03:56 PM IST

धनंजय मुंडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

dhanjaya munde meet raj thakarey28 ऑगस्ट: विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट म्हणजे मतांची बेगमी करण्याचा धनंजय मुंडेचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. या निवडणुकीत भाजपनं आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन पृथ्वीराज काकडे या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय.

त्याचबरोबर विरोधकांची सर्व मतं काकडेंच्या पारड्यात जातील असे प्रयत्न गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेत. आघाडीचे संख्याबळ पाहता धनंजय मुंडे सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

मात्र तरीही धनंजय मुंडे यांनी इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय. राज ठाकरे यांनी येत्या विधान परिषद निवडणुकीत मनसे तटस्थ राहिल अशी भूमिका घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close