S M L

ऐतिहासिक 'मिलियन मार्च'ला 50 वर्षं पूर्ण

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2013 06:20 PM IST

ऐतिहासिक 'मिलियन मार्च'ला 50 वर्षं पूर्ण

i have dream28 ऑगस्ट : अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांनी वर्णद्वेषाविरोधात काढलेल्या ऐतिहासिक मिलियन मार्चला आज 50 वर्षं पूर्ण होत आहेत. याच मोर्चात मार्टिन ल्यूथर किंग यांनी 'आय हॅव अ ड्रीम' हा ऐतिहासिक नारा दिला होता. महात्मा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला होता.

कृष्णवर्णीयांची गुलामीतून सुटका व्हावी आणि त्यांना रोजगाराच्या समान संधी मिळाव्या यासाठी किंग यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. याच चळवळीतलं एक मोठं पाऊल म्हणजे 1963 सालचा मिलियन मार्च हा मोर्चा. त्यांनी लाखो कृष्णवर्णियांना घेऊन वॉशिंग्टनवर मिलियन मार्च काढला होता.

या मोर्चाला मिलियन मार्च असं संबोधण्यात आलं. याच मोर्चाच्या परिणाम म्हणजे अमेरिकी काँग्रेसनं कृष्णवर्णीयांच्या हक्काचा कायदा मंजूर केला. 50 वर्षांपूर्वी 28 ऑगस्टला म्हणजे आजच्याच दिवशी या मोर्चाची सांगता झाली होती. यावेळी मार्टिन ल्यूथर किंग यांनी 'आय हॅव अ ड्रीम' म्हणत एक ऐतिहासिक भाषण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close