S M L

मुतालिकचा मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंध असल्याचा संशय

29 जानेवारी, कर्नाटककर्नाटकात मंगलोर इथं पबवर हल्ला करणार्‍या श्रीराम सेनेचा सूत्रधार प्रमोद मुतालिक याची आणि प्रसाद पुरोहित याची भेट पुण्यात झाली होती. पुरोहितचा फोन कॉल एटीएसनं टॅप केला होता त्यात ही माहिती उघड झाली आहे. हाच प्रसाद पुरोहित मालेगाव बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आहे. त्यामुळेच मंगलोर पब हल्ल्यातला प्रमुख आरोपी प्रमोद मुतालिकचे मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्राची एटीएस टीम मुतालिकची चौकशी करणार आहे. एटीएसची टीम लवकरच मंगलोरला जाणार आहे. कर्नाटकात मंगलोर इथं एका पबवर हल्ला केल्यामुळं प्रमोद मुतालिक प्रकाशझोतात आला. हाच प्रमोद मुतालिक चांगलं काम करतो असं शिफारसपत्र दिलंय प्रसाद पुरोहितनं म्हणजेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या सूत्रधारानं. ऍन्टी टेररिस्ट स्क्वाडनं प्रसाद पुरोहित आणि बॉम्बस्फोटाचा आणखी एक आरोपी शंकराचार्य अमृतानंद उर्फ दयानंद पांडे यांच्यातील फोन कॉल टॅप केला होता. त्यात मुतालिकचा उल्लेख आहे. तो उल्लेख मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपपत्रात पोलिसांनी जोडलेल्या कागदपत्रात आहे.त्यानुसार प्रसाद पुरोहित म्हणाला "नुकतीच पुण्यात आमची एक बैठक झाली. कर्नाटकात एक ग्ट आहे जो चांगलं काम करतोय. भाजप आणि संघ परिवाराशी जोडलेले हे लोक आहेत. बजरंग दलाचे ते कर्नाटकाचे प्रमुख होते. मतभेदांमुळे त्यांना पदावरुन काढलं किंवा ते बाजूला झाले. त्यांनी वेगळंी संघटना काढली. हिंदू राष्ट्रसेना आणि श्रीराम सेना."बजरंग दलातून मुतालिकला काढून टाकलं असलं तरी पबवर हल्ला करुन मुतालिकनं दाखवून दिलं की बजरंग दल आणि श्रीराम सेना यांची नावं वेगळी असली तरी धोरणं एकच आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 11:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close