S M L

...तर तुमचा दाभोलकर करू, अण्णांना धमकी पत्र

Sachin Salve | Updated On: Aug 31, 2013 09:37 PM IST

Image img_234002_annahazare344_240x180.jpg31 ऑगस्ट : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अण्णा तुम्ही देशात लष्करी राजवटीची मागणी करा आणि जर आपण असं केलं नाही तर तुमचा दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. 29 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथील अण्णांच्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलंय.

या पत्रात अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी उभारलेल्या लढ्याची आठवण करून देत काँग्रेस सरकारने 10 वर्षांपासून सत्ता भोगलीय. पण देशात कुपोषण, भूकबळी गेलेत, भ्रष्टाचार बोकाळलाय गरिबांचा बळी जातोय. आता सशस्त्र क्रांतीची गरज आहे यासाठी तुम्ही लढा उभा करावा अन्यथा तुमचा दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आलीय.

सध्या अण्णा अमेरिकेच्या दौर्‍यावर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. उद्या अण्णा भारतात येणार असून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या पत्रानंतर राळेगणमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहे. हल्लेखोरांच्या शोध घेतला जात आहे. पण शुक्रवारी पुण्यात 'साधना'च्या संपादकांनी धमकी पत्र पाठवण्यात आल्याचं उघड झालं. आणि आज अण्णा हजारे यांना धमकी पत्र पाठवण्यात आलं आहे त्यामुळे हा प्रकार समाजकंटकाचा आहे की कुणी खोडसाळपणा केलाय याचा तपास पोलीस घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2013 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close