S M L

मुंडे काका-पुतण्याच्या लढाईचा आज फैसला

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2013 07:47 PM IST

Image img_223352_dhanjaymunde_240x180.jpg02 सप्टेंबर : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय लढाई आता खुलेआम सुरू झालीय. धनंजय मुंडेंनी काकांचा हात सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे विधान परिषदेच्या पोडनिवडणुकीतून पहिल्या लढाईसाठी मैदानात उतरले. पण आपला साथ सोडून देणार्‍या पुतण्याला धडा शिकवण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनीही चांगलीच फिल्डिंग लावलीय. आज या विधान परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. आज संध्याकाळी 5 च्यानंतर याचा निकालही जाहीर होईल.

विधान परिषदेसाठी 289 पैकी 264 आमदारांनी मतदान केलं. मनसेचे 12 आमदार तटस्थ राहिले. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि अपक्ष पृथ्वीराज काकडे यांच्यात ही लढत होतेय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अधिकृत उमेदवारानं अर्ज मागे घेतला आणि भाजपनं काकडेंना पाठिंबा दिला.

गोपीनाथ मुंडे यांनी सर्व ताकद काकडेंच्या मागे लावून आपल्या पुतण्याला धडा शिकवण्याचा चंग बांधलाय, मात्र राष्ट्रवादीचं संपूर्ण बळ धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्यानं त्यांचं पारडं जड आहे. संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला होणार आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडून आलेले सर्व आमदार हे मतदार असतात. काँग्रेस राष्ट्रवादीकडे बहुमत असलं, तरी मुंडेंनी सरकारी आमदारांनाही धनंजयविरोधात मतदान करण्याचं नाव न घेता आवाहन केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2013 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close