S M L

तरूणी होणार लखपती, सुकन्या योजना मंजूर

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 05:28 PM IST

तरूणी होणार लखपती, सुकन्या योजना मंजूर

maharashtra girl04 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत सत्ताधार्‍यांनी योजना,अनुदान, प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा लावलाय. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सुखन्या योजना अखेर मार्गी लागली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण अशा सुकन्या योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दारिद्र्य रेषेखाली तरूणी आता लखपती होणार आहे. ही योजना 1 जानेवारी 2014 पासून अंमलात येणार आहे.

 

या योजनेसाठी राज्य सरकारनं 573 कोटींची तरतूद केलीय. या योजनेनुसार मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावे राज्य सरकार आयुर्विमा महामंडळात 21 हजार 200 रूपये तिच्या नावे गुंतवणार आणि ती 18 वर्षांची झाल्यानंतर तिला 1 लाख रूपयाची मदत मिळणार आहे. ही योजना फक्त दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना लागू आहे. या पैशांतून तिला दरवर्षी इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दर महिन्याला 100 रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

 

तसंच मुलगी अठरा वर्षाची होत नाही तोपर्यंत लग्न करू नये अशी अटही या योजनेत घालण्यात आलीय. जर मुलीच लग्न 18 च्या अगोदर केल्यास ही योजना मिळणार नाही अशी अट घालण्यात आलीय. ही योजना सध्या मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीत राबवली जात आहे.

या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

1) मुलगी जन्माला आल्यावर 21 हजार 200 रुपये तिच्या नावे गुंतवणार

2) मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये मिळणार

3) घरातली जबाबदार व्यक्ती गेली तर 75 हजार रुपये देणार

4) घरातली कमावती व्यक्ती अपंग झाल्यास 60 हजार रुपये देणार

5) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी ही योजना लागू

6) पहिल्या दोन अपत्यांना ही योजना लागू

7) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात वर्षाला सरासरी 2 लाख 30 हजार मुली जन्माला येतात

8) या योजनेसाठी राज्य सरकारनं 573 कोटींची तरतूद केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close