S M L

'मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचं हे राजकारण'

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 08:53 PM IST

'मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचं हे राजकारण'

raj udhav on sarkar04 सप्टेंबर : मदरशांना आर्थिक मदत देण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना, भाजप आणि मनसेने विरोध केलाय. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने केवळ निवडणुकांवर डोळा ठेवूनच हे राजकारण केलंय, असा विरोधकांचा आरोप आहे.

 

काँग्रेसची पत गेलीय - राज ठाकरे

ऐन निवडणुकीच्या तोंडावर असल्या योजना मंजूर करायच्या हे काँग्रेसचं जुनं राजकारण आहे. पण यामुळे काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही. कारण आता मुस्लिम समाज इतका दुधखुळा राहिला नाही. त्यांना हे सगळं माहित आहे की हे मतांसाठीच करण्यात आलाय. त्यामुळे काँग्रेसची जी पत जायची आहे ती गेली आहे अशा गोष्टींमुळे ती परत येणार नाही अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.

मदत देणं चुकीचं - उद्धव ठाकरे

आता धर्मांध कोण आहे? एकीकडे सातत्याने हिंदू धर्मियांना बदनामा करायचं. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ही लोकं सोडत नाही. परंतू मुस्लिम समाजाच्या मतांच्या बेगमीसाठी आर्थिक मदत देणे हे चूक आहे. आमचा आक्षेप मदत देण्यावर नाहीय पण आम्ही जर काही म्हटलं तर आम्ही धर्मांध होतो.पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं तर तो सर्वधर्म समभाव होतो हे योग्य नाहीय अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठी शाळांना अनुदान बंद मग मदरशांना का? -देवेंद्र फडणवीस

मराठी शाळांना अनुदान बंद करायचा आणि मदरशांना अनुदान द्यायचं ही जी सरकारची नीती आहे. याच्यामध्ये त्रृष्टीकरण आहे. जर मदरशांमध्ये सेक्युलर अभ्यासक्रम शिकवला जात असेल तर अनुदान का द्यायचा?, आमचा याला विरोध नाही पण राज्याचं धोरण हे सेक्युलर आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. आणि धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की, कोणत्याही धर्माला धार्मिक प्रचार करण्यासाठी सरकार पैसा देत नाही. ज्या मदारशांमध्ये अनुदान दिलं जाईल तिथं धार्मिक शिक्षण बंद केलं जाईल का? सरकार असा वटहुकूम काढेल का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 08:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close