S M L

मुंबई गँगरेप: चार आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2013 04:16 PM IST

mumbai gang rape_new05 सप्टेंबर : मुंबईतील शक्तीमिलमधल्या सामूहिक बलात्कार प्रकणातील 4 आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज या नराधमांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांमार्फत केली होती. मात्र कोर्टाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

 

22 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये फोटो शूट करण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकार तरूणीवर या पाच आरोपींपैकी दोघांनी बलात्कार केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. पोलिसांनी तात्काळ सूत्र फिरवली आणि अवघ्या तीनच दिवसात या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्यात. या पाच आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आलीय. मात्र चौघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

या चौघांविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावा आहे आणि लवकरच या आरोपपत्र दाखल करणार असंही पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी स्पष्ट केलं. ज्या दोघांनी अत्याचार केला त्यांचे डीएनएही जुळले असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणखी भक्कम बाजू पोलिसांना मिळालीय. चौकशी दरम्यान या आरोपींनी 31 जुलै रोजी आणखी एका तरूणीवर शक्ती मिलमध्येच बलात्कार केला होता याबाबत पीडित तरूणीने तक्रार दाखल केली असून पीडित मुलींनी आरोपींची ओळखही पटलीय.

 

या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला अटकही करण्यात आली. मागिल वेळी कोर्टात आरोपींना हजर केले असता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी अंडी,टोमॅटो फेकली होती. यावेळी असा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात बंदोबस्त वाढवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2013 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close