S M L

टीव्हीचं रिमोट दिलं नाही म्हणून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड

नाशिकच्या सिडको भागातील दत्तनगर परिसरातील बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग मनवटकर याने हे कृत्य केलंय.

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2017 09:32 PM IST

टीव्हीचं रिमोट दिलं नाही म्हणून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड

16 जून : टीव्हीचे रिमोट न दिल्याचा राग आल्यानं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सिडको भागातील दत्तनगर परिसरातील बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग मनवटकर याने हे कृत्य केलंय.

काल गुरुवारी मध्यरात्री पत्नी शोभा आणि पती पांडुरंग याचं टीव्हीच्या रिमोर्ट वरून भांडण झालं आणि यात पांडुरंग यांनी घराबाहेर जाऊन दगड आणून पत्नीच्या डोक्यात टाकला. या घटने पत्नीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोप पांडुरंग फरार झाला. या घटनेचा तपास अंबड पोलीस करत असून पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंगच्या शोधत टीम रवाना केली असून त्याच्या विरोधात कलम 302 अंतर्गत खुनाचा दाखल केला आहे. या दोघांना 10 वर्षाच्या आतील तीन लहान मुली असून या घटने नंतर परिसरात नागरिकांन मधे हळहळ व्यक्त होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2017 09:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close