S M L

आयबीएन लोकमतची डिजिटल गुढी, वेबसाईट नव्या रंगात...नव्या रूपात...

आयबीएन लोकमतची अधिकृत वेबसाईट www.ibnlokmat.tv आजपासून नव्या रंगात, नव्या ढंगात आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. त्यासोबतच बातम्या, व्हिडिओ, फोटो गॅलरी, कार्यक्रम हे तर आहेतच पण यासोबत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 03:46 PM IST

आयबीएन लोकमतची डिजिटल गुढी,     वेबसाईट नव्या रंगात...नव्या रूपात...

28 मार्च : गेल्या आठ वर्षांपासून इंटरनेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या आमच्या वेबसाईटने आज गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर नव्या रूपात 'वेब भरारी' घेतली आहे. आयबीएन लोकमतची अधिकृत वेबसाईट www.ibnlokmat.tv आजपासून नव्या रंगात, नव्या ढंगात आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. त्यासोबतच बातम्या, व्हिडिओ, फोटो गॅलरी, कार्यक्रम हे तर आहेतच पण यासोबत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून अहोरात्र सुरू असलेली आणि कायम अपडेट राहणारी आमची वेबसाईट राज्यासह देश-विदेशातील वाचक/प्रेक्षकांना सर्व महत्त्वाच्या घडामोडी पोहोचवत आलीय आणि यापुढेही राहणार आहेच. जगभरातून तब्बल 115 राष्ट्रांतून आयबीएन लोकमतच्या वेबसाईटला प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे.

वेबसाईटसोबतच आम्ही सोशल मीडियावरही आघाडीवर आहोत. आम्ही फेसबुक, ट्विटर, यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद नियमितपणे साधत असतो. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात घडलेली घटना असो अथवा दिल्लीतील राजकीय आखाडा किंवा अमेरिकेत घडलेली एखादी 'ब्रेकिंग न्यूज' देण्यात आयबीएन लोकमत नेहमी अव्वल राहिलं आहे आणि राहणार... पण हे सगळं होऊ शकलं वाचकहो आपल्यामुळे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close