S M L

खुशखबर, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात

पेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. ही दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 15, 2017 11:09 PM IST

खुशखबर, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात

15 मे : पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. ही दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

सतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीला कंटाळलेल्या सर्वसामान्यांना अखेर दिलासा मिळालाय.   आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये.  मागील महिन्यात पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महागलं होतं. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच पेट्रोल प्रतिलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. अखेर मागील महिन्यातील वाढ कपात झाली असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 11:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close