S M L

जुलैमधील पावसामुळे धरणं भरू लागली; राज्यातील धरणांमध्ये 42.76% उपयुक्त पाणीसाठा

मागच्या वर्षी 24 जुलैपर्यंत फक्त 34.13% उपयुक्त साठाच धरणांमध्ये उपलब्ध होता.

Sonali Deshpande | Updated On: Jul 24, 2017 06:35 PM IST

जुलैमधील पावसामुळे धरणं भरू लागली; राज्यातील धरणांमध्ये 42.76% उपयुक्त पाणीसाठा

24 जुलै: जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धरणांमध्ये 42.75 टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मागच्या वर्षी 24 जुलैपर्यंत फक्त 34.13% उपयुक्त साठाच धरणांमध्ये उपलब्ध होता.

महाराष्ट्रात एकूण 138 मोठी धरणं असून या धरणांमध्ये 47.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पाच्या 256 धरणांमध्ये 35.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर छोट्या धरणांमध्ये 25 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकणातील धरणं सर्वाधिक भरली असून त्यांच्यामध्ये 85.91 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर नागपूर विभागातील धरणं सगळ्यात कमी भरली असून त्यांच्यामध्ये फक्त 18.93 टक्के पाणीसाठी आहे.

एकंदर आताच्या परिस्थितीवरून अजून काही काळ असाच पाऊस पडल्यास यावर्षी समाधानकारक पाणीसाठा धरणांमध्ये असेल असं म्हणण्यास हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close