S M L

मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात,'श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावा'

श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावण्याची सूचनाच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केलीय.

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2017 01:54 PM IST

मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात,'श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावा'

29 एप्रिल : अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांवर कराचा बोझा लावण्याचा विचार मोदी सरकार करतंय. श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावण्याची सूचनाच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केलीय.

कृषी उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लावला जाणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच स्पष्ट केलंय. तरी सुद्धा पण अरविंद सुब्रमणियन यांनी कर लावण्याची मागणी केलीये. नीती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांनीही कृषी उत्पन्नावर कर लावण्याविषयी मतप्रदर्शन केलं होतं. त्यांच्या या विधानावर बराच गदारोळ निर्माण झाला होता.

शेतीच्या उत्पन्नावर कर न लावण्याचे घटनात्मक निर्बंध केंद्र सरकारवर आहेत. राज्यांना मात्र असे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राज्यांनी सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकाच मापात न तोलता त्यांच्या अधिकारात श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावावा असं सुब्रमणियन म्हणाले.

तर दुसरीकडे तूर, डांबीळ, द्राक्ष, कांदे, मिर्ची आणि मोंसबी या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे खरंच महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close