S M L

राजस्थानात लग्नसमारंभात भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू

वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे.

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2017 09:41 AM IST

राजस्थानात लग्नसमारंभात भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू

11 मे : राजस्थानातल्या भरतपूर जिल्ह्यात  काल (बुधवारी) रात्री वादळी वारे आणि पावसामुळे एका लग्नाच्या हॉलची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.

या हॉलमध्ये लग्नसोहळा सुरू होता. त्यावेळी वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या भिंतीचा आसरा घेतला होत. मात्र, वाऱ्याचा जोर इतका होता, की ही भिंत कोसळली आणि अनेक जण भिंतीखाली सापडले.

अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. तर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close