S M L

ब्राझीलवर 'शोककळा'

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2014 03:08 PM IST

ब्राझीलवर 'शोककळा'

[wzslider]

आपल्या मायदेशी फिफा वर्ल्डकपचा मेळा भरवणार्‍या ब्राझीलवर लाजीरवाण्या पराभवाची वेळ येईल असं कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण खेळात कुणासोबत कधी काय घडू शकतं याचं जिवंत उदाहरण ब्राझील ठरलंय. सेमीफायनलमध्ये जर्मनी विरुद्धच्या सामन्यात ब्राझीलने लोटांगण घेतलं होतं. 7-1 ने असा धक्कादायक लाजिरवाण्या पराभवाला ब्राझीलला सामोरं जावं लागलं. 30 मिनिटाच्या आता जर्मनीने 5 गोल करून मॅचवर ताबा मिळवला. आता आपला संघ हरतोय हे पाहुन ब्राझीलच्या चाहत्यांना अक्षरश: रडू कोसळलं. चाहते समोरचा पराभव पाहुन हादरुन गेले होते. मैदानावर फक्त स्तब्ध होऊन काही तरी चमत्कार घडेल याचीच चाहते वाट पाहत होते पण ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे चाहत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. मॅच संपल्यानंतर स्टेडियममध्ये स्मशानशांतात पसरली होती. ब्राझीलचे खेळाडू चाहत्यांची माफी मागत रडत मैदानावर कोसळले होते...फुटबॉल वेड्या या देशावर आता शोककळा पसरलीय..त्याचीही बोलकी छायाचित्र...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2014 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close