S M L

ओबामांची कार भारी, विमान भारी...सुरक्षाच लय भारी !

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 02:42 PM IST

ओबामांची कार भारी, विमान भारी...सुरक्षाच लय भारी !

[wzslider autoplay="true"] 19 जानेवारी : सर्वात शक्तिशाली, प्रगतशील राष्ट्राचे अध्यक्ष बराक ओबामा... त्यामुळेच बराक ओबामांची सुरक्षाही तितकीच अभेद्द अशीच असते. ओबामांचा कारवर बॉम्ब हल्ला झाला तरी कारला काहीच होत नाही, उलट ही कारच हल्लेखोरांना प्रत्युत्तर देऊ शकते...एवढंच नाहीतर ओबामा ज्या विमानाने प्रवास करतात, त्या विमानात त्यांचं 'छोटंस घरं' आणि 'ऑफिस'ही सामावलेलं आहे. नेमका कसा असतो राष्ट्राध्यक्ष ओबामांचा ताफा याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

ओबामांची 'द बिस्ट'

'द बिस्ट' ही गाडी खास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठीच बनवण्यात आली आहे. या गाडीत ओबामांसह आणखी चार प्रवासी बसू शकतात. सुरक्षेसाठी कडेकोट उपायोजनाही यांत करण्यात आल्या आहेत. या गाडीचा पत्राच 8 इंच जाडीचा आहे. इंधनाची टाकी अशाप्रकारे बनवलेली आहे की, तिच्याखाली बॉम्बस्फोट झाला तरीही टाकीचा स्फोट होत नाही. गाडीत ओबामांच्या ब्लड ग्रुपचं रक्तही साठवून ठेवलेलं असतं. आणीबाणीच्या स्थितीसाठी ऑक्सिजनही तयार असतो. गाडीचा आतला भाग इतका सुरक्षित असतो की बाहेर विषारी वायू पसरला तरी तो आत जात नाही. या गाडीत अज्ञात ठिकाणी बंदुका आणि रॉकेट लाँचर्स लपवलेली असतात. म्हणजे, गाडीवर कुणी गोळीबार केला, तर आपोआप त्याचं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. ओबामांच्या ताफ्यात ज्येष्ठ डॉक्टर्स आणि शस्त्रक्रियेसाठी सज्ज असलेली ऍम्बुलन्सही असते. ओबामांच्या गाडीत सॅटलाईट फोन्स असतात आणि ते व्हाईट हाऊस आणि पेंटॅगॉनशी हॉटलाईनही जोडलेली असते. ओबामांच्या परदेशी दौर्‍यामध्ये कधीकधी या गाडीसाठीचं इंधनही अमेरिकेतून आणलं जातं.

'एअर फोर्स वन'

ओबामा 'बोईंग 747' या विमानाने प्रवास करतात. ज्या-ज्या देशात ते जातात तेथे 'एअर फोर्स वन' या लष्करी विमानातून त्यांच्या दोन गाड्या नेल्या जातात. ओबामा प्रवास करणार्‍या या भव्य विमानात अनेक बेडरूम्स, कॉन्फरन्स रूम्स, टेक्नॉलॉजी सेंटर, प्रेस सेंटर आहेत. विमानात सॅटेलाईट फोन्स असल्यामुळे ते जगात कुठेही कुणाशीही बोलू शकतात. गुप्तचर विभागानं सुचवलं तर या विमानाबरोबर तीन लढाऊ विमानंही प्रवास करतात. ओबामांचं जेवणही सिक्रेट सर्व्हिसच्या देखरेखीखाली बनतं. जेवण तयार झाल्यावर सर्व्हिसचे अधिकारी हे जेवण आधी चाखतात आणि मगच ते राष्ट्राध्यक्षांना दिलं जातं.

असा आहे ओबामांचा ताफा

- ओबामांच्या कॅडिलॅक लिमोझिन 2 गाड्या लष्करी विमानानं त्या देशात नेल्या जातात

- ओबामा बोईंग 747 या मोठ्या विमानानं प्रवास करतात. ओबामा त्यात चढल्यावर या विमानाला 'एअर फोर्स वन' अशी होते

- या भव्य विमानात अनेक बेडरूम्स, कॉन्फरन्स रूम्स, टेक्नॉलॉजी सेंटर, प्रेस सेंटर असतं

 - विमानात असलेल्या सॅटेलाईट फोन्समुळे ते जगात कुठेही कुणाशीही बोलू शकतात

- गुप्तचर विभागानं सुचवलं तर या विमानाबरोबर तीन लढाऊ विमानंही प्रवास करतात

- ओबामांचं जेवणही सिक्रेट सर्व्हिसच्या देखरेखीखाली बनतं. जेवण तयार झाल्यावर सर्व्हिसचे अधिकारी हे जेवण आधी चाखतात, आणि मगच ते राष्ट्राध्यक्षांना सर्व केलं जातं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close