S M L

महाडजवळ दोन एसटी -टँकरच्या विचित्र अपघातात 1 ठार

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2016 05:59 PM IST

महाडजवळ दोन एसटी -टँकरच्या विचित्र अपघातात 1 ठार

20 जून : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ गांधारपाले येथे दोन एसटी आणि टँकर यांच्यात झालेल्या विचित्र  अपघातात एक प्रवाशी ठार तर 45 प्रवाशी जखमी झाले असून खांब येथील दुसर्‍या अपघातात खाजगी मिनी लक्झरी बस पलटी झाल्याने त्यातील 17 प्रवाशी जखमी झाले आहेत.

st bus accident 435महाड भायंदर ही एसटी ठाणे येथून आलेल्या ठाणे चिपळूण एसटीला आदळून अपघात झाल्यानंतर मुंबईहुन येणार्‍या टँकरने ब्रेक लावल्याने तो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या अपघातातील 40 प्रवाशी जखमी झाले असून जखमीवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका गंभीर प्रवाशाला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने ऍसिड असलेला टँकर एसटीवर न आदळल्याने पुढील अनर्थ टळल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. या अपघातातील मृत प्रवाशी पलटी झालेल्या एसटीखाली सापडला. त्याने खिडकीतून उडी मारल्याचा अंदाज पोलीस वर्तवला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close