S M L

दक्षिण आफ्रिकेतल्या गुहेमध्ये सापडले नव्या मानवी प्रजातीचे अवशेष

Samruddha Bhambure | Updated On: Sep 11, 2015 03:50 PM IST

दक्षिण आफ्रिकेतल्या गुहेमध्ये सापडले नव्या मानवी प्रजातीचे अवशेष

[wzslider autoplay="true"]

11 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेतल्या एका गुहेत एका वेगळ्याच मानवी प्रजातीचे अवशेष सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांच्या पथकाला जोहान्सबर्गपासून सुमारे 50 किमी दूर 'रायझिंग स्टार' गुहांमध्ये गाडलेले हाडांचे हे दीड हजारांपेक्षा जास्त अर्धवट अवशेष सापडले आहेत. दक्षिण अफ्रिकेतल्या सोथो या भाषेत तार्‍याला नलेदी असं म्हणतात. या नलेदी गुहेत हे अवशेष सापडले. त्यामुळे या नव्या प्रजातीचं नाव होमोनलेदी असं ठेवण्यात आलं आहे.

नलेडी या मानवाचा मेंदू छोटा म्हणजे जवळपास एका संत्र्याएवढा असावा, तर शरीर सडपातळ होतं, असा संशोधकांचा अंदाज आहे. हे अवशेष 25 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असाही अंदाज आहे. या मानवाचे हात, मनगट आणि पाय हे आधुनिक मानवासारखे आहेत पण मेंदूचा आकार आणि वरचं शरीर हे आदिमानवासारखं आहे. या मानवाच्या हातांच्या अवशेषावरून ते अवजारांचाही वापर करायचे, असं अंदाज व्यक्त केला जात आहे. या अवशेषांच्या अभ्यासावरून मानवी उत्क्रांतीबाबत अनेक नव्या गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातले संशोधक संशोधनासाठी आता जोहान्सबर्ग विद्यापीठात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2015 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close