S M L

'गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2016'चा दिमाखदार सोहळा

Samruddha Bhambure | Updated On: Jan 11, 2016 07:51 PM IST

'गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2016'चा दिमाखदार सोहळा

[wzslider autoplay="true"]

11 जानेवारी : कॅलिफोर्नियात नुकतीच 73वे गोल्डन ग्लोब अवॉर्डसचा दिमाखदार सोहळा पार पडला. गेल्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि अमेरिकन टेलिव्हिझनसाठी हे अवॉर्डस दिले जात असून या वर्षी अनेक अपेक्षित तर काही अनअपेक्षित कलाकारांनी यात बाजी मारली आहे. बेस्ट मोशन पिक्चर्स ड्रामामध्ये लिओनार्डीओ दीकेप्रियोच्या 'द रेवनन्ट' ने बाजी मारली तर याच सिनेमासाठी अभिनेता लिओनार्डोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. बेस्ट मोशन पिक्चर्स म्युझिकल किंवा कॉमेडीमध्ये 'द मार्शियन' सिनेमाला पुरस्कार देण्यात आला आणि या सिनेमातील मुख्य भूमिका असलेल्या अभिनेता मॅट डॅमनला याच कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला. अभिनेत्रींमध्ये ब्री लारसनने 'रुम' सिनेमासाठी आणि जेनिफर लॉरेन्सने 'जॉय' सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची बाजी मारली. या व्यतिरिक्त अनेक दिग्गजांनी वेगवेगळ्या कॅटेरगीजमध्ये पुरस्कार देण्यात आले. या सोहळ्याला संपूर्ण हॉलिवूडने हजेरी लावली हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतील कॅलीर्फोनीयात काल पार पडला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 07:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close