S M L

हे सेलिब्रिटी झाले होते 'रोडपती'!

Sachin Salve | Updated On: May 27, 2016 10:06 PM IST

हे सेलिब्रिटी झाले होते 'रोडपती'!

[wzslider] एका चित्रपटांसाठी कलाकारांना कोटींचं मानधन मिळतं...पण काळ असा येतो की या कोट्यवधी घेणार्‍या सेलिब्रिटींवर कधी काळी रोडपती होण्याची वेळ आली होती...बघुयात कोणत्या कलाकारांवर रोडपतीची वेळ आली...

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाला सुद्धा या सर्व गोष्टींना सामोर जावं लागलं. पण पार्टनर या चित्रपटामुळे नंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्यात. आणि त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आली.

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर सुद्धा रोडपतीची वेळ आली होती. अमिताभ यांच्या एबीसीएल प्रोडक्शनखाली अनेक चित्रपट फ्लॉप गेले. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. त्याच दरम्यान त्यांना कौन बनेगा करोडपती शो होस्ट करण्याची ऑफर आली. तेव्हा ते कर्जमुक्त झाले.

बॉलिवूडचा जग्गु दादा सुद्धा या परिस्थितीपासून वाचू शकला नाही. वेळ अशी आली की त्याला साजिद नाडियाडवाला यांच्याकडून कर्ज घ्यावं लागलं. पण त्या कर्जाची तो परतफेड करू शकला नाही. जग्गुदादाच्या या पडत्या काळात भाईजान सलमान खानने जग्गु दादाची मदत केली.

अभिनेत्री प्रिती झिंटाचा 'इश्क इन पॅरिस' सिनेमा फ्लॉप झाला होता. एवढंच नाहीतर प्रितीने निर्देशक-लेखक अब्बास टायरवाला यांना पैसे न दिल्याची बाब समोर आली. टायरवाला यांनी प्रितीवर केस केली. केसमधून बाहेर पडण्यासाठी सलमान खानने प्रीतीची मदत केली.

राजकपूर यांना सुद्धा हे दिवस या परिस्थीतून जाव लागलं. मेरा नाम जोकर चित्रपटासाठी त्यांनी काही पैसे उधार घेतले. पण हा चित्रपट पडल्याने त्यांना आर्थिक अडचणीला सामना करावा लागला.

शोलेमधील रहीम चाचाची भूमिका साकारणारे एके हंगल यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी उपचारासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. मीडियामध्ये ही बातमी आली तेव्हा बर्‍याच कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला. आणि प्रसिद्ध अभिनेता भारत भुषण यांनासुद्धा दिवाळखोरीचे दिवस आले होते. भुषण यांनी जुगारात आपले पैसे गमावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2016 10:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close