S M L

रजनीकांत@66

Sonali Deshpande | Updated On: Dec 12, 2016 04:26 PM IST

रजनीकांत@66

12 डिसेंबर: रजनीकांत यांचा आज 66वा वाढदिवस. रजनीकांत यांचं आयुष्य म्हणजे एक सुरस कथा. रजनी नावाचं गारुड आज त्यांच्या फॅन्सवर आहे. पाहू या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी...

[wzslider]

1. रजनीकांतचा जन्म 12 डिसेंबर 1950ला बंगलुरू इथे झाला. रजनीकांतचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड. त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड हवालदार होते. आईच्या निधनानंतर रजनीकांतनं घराची जबाबदारी घ्यायचं ठरवलं.आणि त्यानं थोडे दिवस चक्क हमाली केली.

2. एक कंडक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं. तेव्हाही त्यांची तिकीट देण्याची पद्धत, शिट्टी वाजवण्याची स्टाइल एकदम लोकप्रिय झाली होती. त्यावेळी आवड म्हणून त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यांची ही आवडच एक वेड बनली.

3. या वेडापायीच त्यांनी चेन्नईच्या फिल्म इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचं नाटकातलं काम दिग्दर्शक बालाचंदर यांना आवडलं आणि त्यांनी रजनीकांतना सिनेमाची ऑफर दिली.

4. तामिळ सिनेमा 'अपूर्वा रागंगाल'मध्ये रजनीकांत यांची छोटी भूमिका होती. पण सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.रजनीकांत दिग्दर्शक बालाचंदर यांना गुरू मानतात.

5. रजनीकांत यांचं लग्न लताशी झालं. लता यांनी त्यांची मुलाखत एका कॉलेज मासिकासाठी घेतली होती. नंतर दोघांनी लग्न केलं. त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या अशा मुली आहेत.

6. रजनीकांतच्या करियरमध्ये बरेच चढउतार झाले. त्यांची सुरुवात खलनायकी भूमिकांनी झाली. पण नंतर ते सर्वांचेच हिरो बनले.

7. तेलगू सिनेमा 'छिलाकाम्मा चेप्पिनडी'मध्ये रजनीकांतनं प्रमुख भूमिका केली ती पहिल्यांदाच. आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही.

8. त्यांनी एका अमेरिकन सिनेमातही काम केलंय. बॉलिवूडमध्येही त्यांच्या भूमिका गाजल्या. मेरी अदालत, भगवान दादा, जॉन जानी जनार्दन, हम,असली नकली, चालबाज असे अनेक सिनेमे त्यांनी केले.

9. रजनीकांतवर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. 2000मध्ये त्यांना पद्मभूषणनं गौरवण्यात आलं.

10. आता ते '2.0' या सायफाय सिनेमात बिझी आहेत. जयललिता यांच्या निधानमुळे यावर्षी ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2016 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close