S M L

स्पेस टून : लहानमुलांसाठी नवं कार्टुन चॅनेल

30 जानेवारी, मुंबईमाधुरी निकुंभ स्पेस टून नावाचं लहान मुलांचं एक नवं चॅनल लाँच झालंय, कार्टुन्स, अंतराळातले ग्रह-तारे आणि प्लॅनेटस्‌ने बनलेल्या या चॅनलवर आपल्याला काय काय पहायला मिळणारेय. कार्टुन चॅनल्सच्या संख्येत भर पडत चाललीये आणि त्यात आणखी एक नाव ऍड झालंय ते म्हणजे स्पेस टून, लवकरच हे चॅनल सगळीकडे दिसायला लागेल.आता अभ्यास सोडून मुलांनी हे चॅनल का पहावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, यावर चॅनेल एमडींचं म्हणणं आहे की अभ्यास सोपा करण्यासाठीच हे चॅनेल बनवण्यात आलंय. या नव्या चॅनेलविषयी किड्स मीडिया इंडियाचे एम.डी राजीव संगारी सांगतात, " आमच्याकडे वेगवेगळ्या ग्रहांच्या माध्यमातून (प्लॅनेटस्‌च्या ) मुलांना अभ्यास करायला मदत होणारेय. स्पेस टुन हे इंटरनॅशनल चॅनल असून किड्स मीडिया इंडिया या कंपनीनं ते भारतात लॉंच केलंय. गाणी ,गेम शोज आणि ऍक्शन कार्टुन्सचा मोठा खजिनाच या चॅनेलवर आहे. मुलांना टी. व्ही. समोर बसून अभ्यास करायला हे चॅनल लावतं. मनोरंजनासोबत मुलांच्या मानसिक आणि वैचारिक पातळीवर बदल घडवून आणणं हाच चॅनेलचा प्रमुख्य हेतू आहे. " आमच्या प्रत्येक कार्यक्रमातून मुलांना सोशल मेसेज मिळेल हे नक्की. "अशी आशा किड्स मीडिया इंडियाचे एम.डी. राजीव संगारी यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2009 03:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close