S M L

पं. भीमसेन जोशींच्या दुर्मीळ रेकॉर्डिंग्जचा खजिना बाजारात

3 फेब्रुवारी, पुणेप्राची कुलकर्णी पं.भीमसेन जोशींची दुर्मीळ गायकी आता आपल्याला जहज ऐकायला मिळणार आहेत. कारण त्यांच्या दुर्मीळ रेकॉर्डिंग्जचा खजिना बाजारात उपलब्ध झाला आहे. पंडितजींच्या वाढदिवासानिमित्त हा दुर्मीळ रेकॉर्डिंग्जचा खजिना बाजारात आणला आहे. पुण्यात पंडिजींच्या दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डिंग्जचं प्रकाशन करण्यात आलं. पंडित भिमसेन जोशी यांना यंदा भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलंय.या निमित्तानंत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधुन सारेगामा तर्फे माय म्युझिक द सारेगामा इयर्स या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. पंडित भिमसेन जोशींच्या पहिल्या रॅकॉडीर्ंगचा या सीडी मध्ये समावेश आहे.यावेळी पंडितजींचा मुलगा आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. या सीडीमुळं पंडितजींची दुर्मीळ गाणी पहिल्यांदा ऐकायला मिळाल्यामुळे आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केला. पंडितजींच्या अनेक पहिल्या रॅकॉर्डिंगपासून ते नव्या गाण्यापर्यंत अनेक रागांचा या सीडीमध्ये समावेश आहे. वाढदिवस पंडितजींचा असला तरी यानिमित्तानी त्यांच्या रसिकांनाच ही भेट मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2009 02:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2009 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close