S M L

राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय

19 फेब्रुवारी पुणेराज्यभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. तसंच शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते. इथल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित रहाणार आहेत.सरकारनं लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या संघटनांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर शिवनेरीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान सकाळी शिवजयंतीचा मुहूर्तसाधून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीवर गोंधळ घातला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात एस.पी. रवींद्र कदम आणि ऍडिशनल एस.पी. अशोक मोराळे यांच्यासह 10 पोलिस जखमी झाले. त्याचवेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच हेलिकॉप्टर शिवनेरीवर घिरट्या घालत होत.त्यामुळे हेलिपॅडची सुरक्षा वाढवण्यात आली. यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आलं.पण शांततेच्या आव्हानानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली. आता शिवनेरीवरचं वातावरण निवळलं असून मुख्य कार्यक्रम सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 06:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 06:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close