S M L

जेटली बाळासाहेबांना न भेटताच निघून गेले

28 फेब्रुवारी मुंबईभाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली मुंबईत आले. पण लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना न भेटताच पुण्याला निघून गेले. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. मुंबईत प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिरात फ्रेंड्स ऑफ भाजप या संस्थेच्या कार्यक्रमासाठी जेटली मुंबईतआले होते. बाळासाहेब गुरूवारपासून लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना भेटून आले. त्या पार्श्वभूमीवर जेटली बाळासाहेबांना भेटण्यासाठी लिलावतीला जातील अशी अटकळ बांधली जात होती. पण कार्यक्रम संपल्यानंतर जेटली खाजगी विमानातून पुण्याला गेले. पाच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुंबईत आले. पण तेही बाळासाहेबांना भेटायला गेले नव्हते. 25 वर्ष शिवसेना - भाजप यांचा घरोबा आहे. या युतीचे एक शिल्पकार आजारी असताना त्यांना भेटण्याची तसदी भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या अरुण जेटली यांनी दाखवली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2009 04:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2009 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close