S M L

संघाच्या शस्त्रप्रदर्शनावर निवडणूक आयोगाचा बडगा

28 मार्च, रूद्रपूरउत्तराखंडमधल्या रूद्रपूर इथे वर्ष प्रतिपदेच्या कार्यक्रमात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी तलवारी आणि बंदुकांचं राजरोस प्रदर्शन केलं होतं. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता चालू असतानाही संघाने हा धक्कादायक प्रकार केला शुक्रवारी पाडव्याच्या दिवशी केला.खुलेआम बंदुका आणि परजलेल्या तलवारी... असं दृश्य कुठल्या दंगलीतचं नव्हतं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमातला तो धक्कादायक प्रकार होता. उत्तराखंडमधल्या रुद्रपूर इथे पाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात संघाने शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. हे प्रदर्शन नुसतं प्रदर्शन नव्हतं, तर त्यावेळी संघाच्या शिष्यांनर बंदुकांच्या फैरीही झाडल्या होत्या. बसपाने या अशा शस्त्रप्रदर्शानावर जोरदार आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. तसंच या प्रकाराची सरकारी अधिकार्‍यांनीही गंभीर दखल घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2009 06:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2009 06:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close